रंग बरसे...भिगे चुनरिया...रंग बरसे...
अहमदनगर, दि. 18 - नगर मध्ये रंगपंचमी मोठ्या उत्सहात साजरी झाली यामध्ये मुले ,युवक ,महिला डीजेच्या तालावर नाचताना रंग खेळताना दिसत आहेत. रंगपंचमी निमित्त बालगोपाळांनी रंगाची उधळण करत एकमेकांना रंग लावला. तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रंगपंचमीला पाण्याला फाटा देत पाणी न वापरता रंगाची उधळन केली. पाण्याचे महत्त्व त्यांनी या रंगपंचमीच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पटवुन देवुन रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली. पाण्याचे मोल आणि पाणी किती अनमोल या वाक्याला धरुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यीनीनी पाण्याची उधळन न करता कोरडया रंगाचा वापर रंग लावण्याकरीता केला.