अमरिंदर सिंह पंजाबचे नवे मुख्यमंत्री, सिद्धू कॅबिनेट मंत्री
चंदीगड, दि. 16 - मोदी लाटेमध्येही काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले कॅप्टर अमरिंदर सिंह यांनी आज पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर निवडणुकीआधी काँग्रेसचा हात पकडलेले नवज्योतसिंह सिद्धू कॅबिनेट मंत्री बनले आहेत. नवज्योतसिंह सिद्धू यांचं पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न भंगणार?
कॅप्टन अमरिंदर सिंह दुसर्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. याआधी 2002-2007 पर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री होते. कॅप्टन अमरिंदर सिंह हे पंजाबचे 26वे मुख्यमंत्री बनले आहेत.
पंजाबमध्ये दहा वर्षानंतर काँग्रेसचं पुनरागमन झालं आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने शिरोमणी अकाली दल, आम आदमी पक्ष तसंच भाजपला धूळ चारत बहुमत मिळवलं. आता कॅप्टन सिंह यांनी दुसर्यांदा पंजाबची धुरा सांभाळली आहे.