महिलांनी सकारात्मक जीवन जगावे - दिपा मुधोळ
बुलडाणा, दि. 11 - शासकीय व अशासकीय क्षेत्रातील महिलांनी कामाच्या ठिकाणी स्वत:वर होणारा अन्याय लपवून न ठेवता अन्यायाचा प्रतिकार करावा. महिलांनी इच्छाशक्ती जागृत ठेवून सकारात्मक जीवन जगावे. कोणतीही मनात भिती न बाळगता या अन्यायाचा प्रतिकार करावा. तसेच कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ अधिनियम 2013 कायद्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि. प मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दिपा मुधोळ यांनी केले आहे.
कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ अधिनीयम 2013 कायद्याविषयी कार्यशाळा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती मुधोळ बोलत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोफणे, स्थानिक तक्रार समितीच्या अध्यक्षा सुमनताई बोदडे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा मंगलाताई सपकाळ, महिला आर्थिक विकास महामंडळाचे सुमीत तायडे, राज्य महिला आयोगाचे समन्वयक ड भावना नलावडे, ड पी. जे गवारे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रमोद येंडोले यांनी केले.
याप्रसंगी मान्यवरांनी कायद्याविषयी मार्गदर्शन केले. नाटीकेच्या माध्यमातून तक्रार निवारण समितीच्या सकारात्मक व नकारात्मक बाबी उलगडून दाखविण्यात आल्या व कलमनिहाय विश्लेषण करण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा संरक्षण अधिकारी श्रीमती मंजूषी रहाणे, तालुकास्तरीय संरक्षण अधिकारी, सहायक कर्मचारी, समुपदेशक व अन्य कर्मचार्यांनी प्रयत्न केले. संचलन मंजूषी रहाणे यांनी केले.