शॉर्ट सर्कीटमुळे गव्हाच्या पिकाला भिषण आग
बुलडाणा, दि. 11 - दे.माळी येथील जनार्धन स्वामी यांच्या मंदिराशेजारील दक्षिण बाजुला असलेल्या गव्हाच्या पिकास 9 मार्च रोजी भिषण आग लागुन अर्धा एक्कर गहु जळुन खाक झाला. शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीत विश्वनाथ भराड यांच्या शेतात ही आग दुपारी 2 च्या सुमारास लागली. गावाच्या शेजारील शेतात आगीचे डोंब उसळतांना दिसले तेव्हा गावातील गावकर्यांनी भ्रमनध्वनीवरून एकमेकांना संपर्क करूण आग विझवण्यासाठी जीवाचे रान केले 15 मिनिटानंतर आग विझवण्यात गावकर्यांना यश मिळाले. व दरम्यान गव्हाच्या शेतात इलेक्ट्रीक तार कोसळली आणि गजानन हिवाळे यांना जबरदस्त शॉक बसला त्यांच्यावर मेहकर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना हॉस्पीटलमध्ये भरती करण्यास व आग विझवण्यास प.स.सदस्य शिवप्रसाद मगर, रघुनाथ भराड, विजय सुरूशे, धनंजय मगर, हरीश गायकवाड, राजेश गवई, केशव मगर, बद्री सुरूशे, धनंजय मगर, हरीष गायकवाड, राजेश गवर्ह, केशव मगर, बद्री सुरूशे, अशोक गाभणे अॅटो युनियन यांनी सहकार्य केले. असुन या आगीत झालेल्या नुकसानिचा तात्काळ सर्वे करूण नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी विश्वंभर भराड यांनी केली आहे.
