पक्षीगणनेस जिल्ह्यात उत्स्फुर्त सहभाग
अहमदनगर, दि. 12 - विविध पक्षीमिञ संघटनांतर्फे दरवर्षी देशभर पक्षीगणना केली जाते.या संघटनांचे सदस्य व पक्षीअभ्यासक शिक्षक श्री.जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीही संपुर्ण जिल्हाभर ही पक्षीगणना पार पडली.
यावर्षीसूद्धा सर्व तालुक्यातुन या पक्षीगणनेत सहभागी होणारया हौशी निसर्गप्रेमींच्या सहभागाचा आलेख चढता राहीला.शैक्षणिक विचारधारा या जिल्हास्तरीय व्हाटस अॅप समुहांद्वारा अनेकांना या उपक्रमात सहभागी होता आले. यावर्षी जिल्ह्यातील सर्व14तालुक्यांमधुन एकुण 50प्रौढ निरीक्षकांसह 773 शालेय विद्यार्थ्यांनी एकुण 240 ठिकाणी ही पक्षीगणना केली.
या गणनेत जिल्हाभरात 115 पेक्षा अधिक प्रजातींचे एकुण 66449 पक्षी आढळून आले.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाथर्डी तालुक्यातुन या उपक्रमास मोठा प्रतीसाद मिळाला. या तालुक्यात 17 प्रौढ निरीक्षकांसह 294 विद्यार्थ्यांनी 102 ठिकाणी पक्षीगणना केली. श्रीरामपुर,जामखेड,श्रीगोंदा तालुक्यात त्या तुलनेत अल्प प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने व जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या तलावांत अजुनही पाणीसाठा भरपुर असल्याने स्थलांतरीत व रहिवाशी अशा सर्वच प्रकारच्या पक्षांच्या संख्येत यावर्षी वाढ झाल्याचे दिसून आले.
गेल्या 3-4वर्षांपासुन जिल्ह्यात पाठ फिरविलेल्या रोहीत, विविध प्रकारचे करकोचा पक्षी,विविध प्रकारचे बदक व हंस,चमचा अशा परदेशी पक्षांनीही या वर्षी जिल्ह्यात मोठ्या संख्येने हजेरी लावली.परदेशातुन हजारोंच्या संख्येने येणारया भोरडी या पक्षांची नोंद यावर्षी सर्वाधिक 19977 इतकी झाली. यावर्षी अनेक परदेशी पक्षांबरोबर असुन पिवळा माशीमार,छोटा कंठेरी चिखल्या,तलवार बदक,शिपाई बुलबुल,पांढरा शराटी, मूग्धबलाक, तोई पोपट अशा अनेक नवीन पक्षांची नोंद प्रथमच अहमदनगर जिल्ह्याच्या पक्षीगणनेत झाली.
नामशेष होणारया प्रजातींच्या रेडलिस्टमध्ये घोषित केलेल्या कांडेसर(पांढरया मानेचा करकोचा) या पक्षांची नोंदही जिल्ह्याच्या वेगवेगळ्या पाणथळ भागात झाली असुन त्यांची विणही काही ठिकाणी आढळुन आली आहे.या पक्षांचे संगोपन व संवर्धन होणे गरजेचे असल्याचे मत पक्षीअभ्यासक श्री.जयराम सातपुते यांनी व्यक्त केले. जानेवारी महीण्यात पार पडलेल्या या पक्षीगणनेच्या वेळी श्री.जयराम सातपुते यांच्यासह श्री.शिवकुमार वाघुंबरे,डॉ.अशोक कराळे,अनमोल होन,महेश फलके यांनी जिल्हाभर फिरून छायाचिञणाचे कार्य केले.