Breaking News

शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा जिल्हाभर रास्ता रोको

कर्जमुक्तीसाठी लढा सुरुच राहणार - जालिंधर बुधवत

बुलडाणा, दि. 12 - निसर्गाची अवकृपा, शेतकरी विरोधी आयात धोरण आणि नोटाबंदीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे शेतीमालाचे पडलेले भाव या सर्व बाबींमुळे शेतकरी आर्थीक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीच्या लढ्यासाठी शिवसेना आता रस्त्यावर उतरली आहे. त्याअनंषंगाने आज दि.11 मार्च रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवतयांच्या नेतृत्वात आज बुलडाणा येथे 11 मार्च रोजी सकाळी 9 वाजता धाड नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कृषीप्रधान भारत देश असल्याचे आपण गर्वाने म्हणतो, पण याच कृषीप्रधान देशातील बळीराजा, अन्नदाता हा आत्महत्या करतो ही बाब लाजीरवाणी आहे. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संपुर्ण कर्जमुक्तीची मागणी केली आहे. याच मागणीसाठी आता लढा तीव्र करण्यात येत असुन शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेना ही सत्तेसाठी नाही तर समाजासाठी आहे. भाजप सरकारने शेतकर्‍यांना संपुर्ण कर्जमुक्ती द्यावी, हा लढा सुरुच राहिल, असे यावेळी जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत  म्हणाले. धाड नाका परिसरात सकाळी आंदोलन सुरु झाल्यानंतर सर्व बाजुंनी येणार्‍या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मायबाप शेतकर्‍यांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आवश्यक असल्याचे जालिंधर बुधवत यांनी सांगून शिवसैनिकानी खंबीरपणे लढा अधिक तीव्र करावा, असे सांगितले. यावेळी आंदोलन कर्त्या शेकडो शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. या आंदोलनात जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, अशोक इंगळे, महिला जिल्हा प्रमुख सिंधूताई खेडेकर, राजु पवार, न.प.उपाध्यक्ष विजय जायभाये, उमेश कापुरे, दिपक सोनुने, न.प.सदस्य आशिष जाधव, कैलास माळी, राजु मुळे, वामनराव पडोळ, विजू राऊत, अविनाश वाघ, जिवन राजपूत, लखन गाडेकर, अनिल जगताप, संजय तोटे, राहुल जाधव, गजु टेकाळे, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, गजू धंदर, मोहन विभोटे, रवि धनावत, प्रकाश दांडगे, डिगांबर राजगूरे, सुभाष दळवी, कृष्णा पडोह, गौरव हिवाळे, गजू पाटिल, रफिक शहा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नांदूरा तालूक्यात रेल्वे चौक येथे शिवसेनेचा रास्ता रोको
नांदूरा (प्रतिनिधी) - शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करुन संपूर्ण कर्ज माफ करा, तुर खरेदी त्वरीत सुरू करा आदि मागण्याकरीता आज 11 मार्च रोजी शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. शिवसेना जिल्हा उपप्रमुख वसंतराव भोजने, तालुका प्रमुख संतोष डिवरे, शहर प्रमुख लाला इंगळे, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख मुन्ना पांडे, माजी तालूका प्रमुख बाळासाहेब धोरण, रमेश पाटील यांच्या नेतृत्वात रेल्वे चौक नांदूरा येथे झालेल्या या रास्ता रोको मुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली होती. या वेळी कैलास सातव बळीराम हेलगे, एकनाथ वक्ते, मनोज वक्ते, संतोष अवचार, संदीप पाटील, अर्जुन तांगळे, गजानन वेरुळकर यांच्या सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होत. यावेळी नांदूरा पोलीसांनी सर्व आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले. व कार्यवाही नंतर सोडून दिले.