Breaking News

पाईपलाईन फोडल्यामुळे... जिओ चे मशिन सिल

बुलडाणा, दि. 24 - रिलायन्स जिओ कंपनीची मशिन वायर टाकण्याचे काम दे.राजा येथे करीत आहे. काम सुरू असतांना खोदकाम करतांना पाणीपुरवठा पाईपलाईन फुटून नुकसान केल्यामुळे सदरील मशिन आज 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सिल करण्यात आलेली आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे डॉ.शिंदे हॉस्पीटल परिसर, त्र्यंबकनगर, पिंपळनेर, मोठा परिसर या भागातील नागरिकांना पाण्यापासून वंचीत रहावे लागणार आहे. अनधिकृत खोदकाम करुन जिवनावश्यक पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फोडून नगर परिषदेचे आर्थीक नुकसान केल्यामुहे सदरील मशिन सिल करण्यात आले. या कार्यवाहीमध्ये मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्या आदेशान्वये कर्मचारी डोईफोडे, महाजन, सावजी, खुळे, तिडके, सै.नजीर सह कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. यावेळी डॉ.रामदास शिंदे, नंदन खेडेकर, पवन झोरे उपस्थित होते.