Breaking News

आयएमए कडुन बेमुदत वैद्यकीय सेवा बंद!

बुलडाणा, दि. 24 - संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळया ठिकाणी डॉक्टरांवर होणार्या भ्याड हल्ल्यांचा निषेध व वैद्यकिय संरक्षण कायदा 2010 ची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी घेवून आज बुलडाणा, मेहकर व  जिल्हयाभरात डॉक्टर असोसिएशन तर्फे डॉक्टरांनी बेमुदत वैद्यकीय सेवा बद ठेवून निषेध नोंदविला. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवण्यात आली होती. बुलडाणा येथे जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. तर मेहकर येथे तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी एकत्रीत येवून उप विभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले.
मागील आठवडा भरापासून महाराष्ट्रातील धुळे, नाशिक व मुंबई सह राज्यात काही ठिकाणी डॉक्टरांवर प्राणघातक हल्ले झाले आहेत. या हल्ल्याचा निषेध व हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसह डॉक्टर संरक्षण कायदा 2010 ची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. दरम्यान डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पासुन जिल्ह्यातील डॉक्टरांनी बेमुदत वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आणि जोपर्यंत हल्लेखोरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत वैद्यकीय सेवा बंद राहण्यार असल्याचे कळविण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा मात्र सर्व ठिकाणी पुरविण्यात आल्या. यामुळे रुग्णांची तारांबळ उडाल्याचे निदर्शनास आले.
बुलडाणा शहरात आज 24 मार्च रोजी डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ शहरातुन मुक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आयएमए चे जिल्हाध्यक्ष डॉ.जी.बी.राठोड व सचिव डॉ.एस.पी.सावळे यांनी दिली आहे. सदर मोर्चा सकाळी 9.30 वाजता काढण्यात येईल.