विकासात्मक व्हिजनने प्रभागातील प्रश्न सोडविले जात आहे - नज्जू पैलवान
अहमदनगर, दि. 20 - प्रभाग क्र.19 मधील झेंडीगेट चौकात नगरसेवक हाजी नजीर अहमद उर्फ नज्जू पैलवान यांच्या विकास निधीतून बंदपाईप गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेवक नज्जू पैलवान, दरबार फौंडेशनचे अध्यक्ष हाजी वाजिद जहागीरदार, हाशीर शेख, रिजवान जहागीरदार, जहिर शेख, अकलाख जहागीरदार, अल्ताफ शेख, शहेबाज चमडेवाला, महेबुब शेख, फैसल इराणी, नासिर शेख, इलियास जहागीरदार, रियाज जहागीरदार, साबिर सय्यद, अजमत इराणी, ऐजाज सय्यद आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
प्रभागाच्या विकासात्मक दृष्टीकोनातून नगरसेवक नज्जू पैलवान यांचे कार्य चालू आहे. नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी स्वखर्चातून बोअरवेल उपलब्ध करुन दिल्या. यामुळे प्रभागातील महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे. मॉडेल प्रभागकडे या प्रभागाची वाटचाल चालू असल्याचे हाजी वाजिद जहागीरदार यांनी सांगितले. नज्जू पैलवान म्हणाले की, विकासात्मक व्हिजनने प्रभागातील प्रश्न सोडविले जात आहे. झेंडीगेट येथील अनेक वर्षापासूनची ड्रेनेज लाईन जीर्ण झाली होती. उघड्या गटारीने स्वच्छता व दुर्गंधीचा गंभीर प्रश्न निर्माण होवून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत होता. वारंवार गटार तुंबुन मैलमिश्रित पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचा सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी या कामाला सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी तत्परता दाखविणारे नगरसेवक नज्जू पैलवान यांचा नागरिकांच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला.