Breaking News

निसर्ग प्रत्येक क्षणी आपल्याला शिक्षण देते - सौ.अंजली वल्लाकट्टी

अहमदनगर, दि. 20 - निसर्ग हा सुंदर आहे. रम्य आहे. निसर्ग आपल्याला प्रत्येक्ष क्षणी काहीना काही देत असतो. प्रत्येक क्षणी तो नवनवीत शिक्षण देत असतो. निसर्ग जे देतो ते आपण घ्यावे आणि माणासांमध्ये वाटत राहाव, असे प्रतिपादन छत्रपती पुरस्कार विजेती महाराष्ट्राची सुवर्णकन्या सौ.अंजली वल्लाकट्टी यांनी केले.
पद्मशाली सोशल फौंडेशनच्या वतीने शिवजयंतीनिमित्त प्राचार्य बत्तीन पोट्यान्ना प्रा.शाळेत चित्रकाला स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. त्याचे बक्षिस वितरण अंजली वल्लाकट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युनूस तांबटकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. विठ्ठल बुलेबुले, सौ.लाहोर हे उपस्थित होते. याप्रसंगी पद्मशाली सोशल फौंडेशनचे अध्यक्ष रोहित गूंडू, उपाध्यक्ष श्रीनिवास बुरगुल, सचिव अजय लयचेट्टी, कार्याध्यक्ष अमोल गूंडू, खजिनदार राहुल पासकंटी, मयुर कल्याणम,विशाल द्यावनपेल्ली, इंजि.अक्षय बल्लाळ, संजय नुती आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा.विठ्ठल बुलबुले यांनी मुलांचे खेळ घेतले. अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना युनूस तांबटकर म्हणाले कि, मुलांच्या मनात प्रचंड कल्पना असते. त्या कल्पनेला वाव देणे हे शिक्षकांइतकच पालकांचे व समाजाचेही कर्तव्य आहे. पद्मशाली सोशल फौंडेशनने मुलांच्या कलागुणांना वाव दिले. त्याचे कौतुक आहे. मुले व्यक्त होतात हे महत्वाचे त्यांना सर्वांगाने व्यक्त होऊ द्या, असे त्यांनी सांगितले.