Breaking News

पिंपरे बु. येथील नेहरु युवा मंडळास उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार जाहीर

सातारा, दि. 22 (प्रतिनिधी) : पिंपरे बु. ता. खंडाळा येथील नेहरु युवा मंडळास सन 2016-17 रोजीचा उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरुप  25 हजारचा धनादेश व सन्मानचिन्ह असे आहे. गुरुवार, दि. 23 मार्च 2017 रोजी नियोजन भवन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे सकाळी 11.00 वा. हा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी दिली.
युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत प्रत्येक वर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या एका युवा मंडळास उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार देवून गौरविण्यात येते. यावेळी सामाजिक क्षेत्रात नेहरु युवा मंडळाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुढील युवकांना युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
अ‍ॅड. संभाजी मोहिते अध्यक्ष नेहरु युवा मंडळ शिरगाव ता. कराड (जिल्ह्यामध्ये पहिली युवा मंडळाच्या माध्यमातून माध्यमिक शाळा सुरु केली आहे.), निलेश धनावडे अध्यक्ष नेहरु युवा मंडळ करंजे ता. जावली, दत्तात्रय यादव अध्यक्ष नेहरु युवा मंडळ सोमंथळी, ता. फलटण, संतोष पवार अध्यक्ष नेहरु युवा मंडळ धावडशी, ता. सातारा, नवनाथ जगताप अध्यक्ष नेहरु युवा मंडळ, धोंडेवाडी, ता. खटाव, संदिप तानाजी पांगारे सचिव नेहरु युवा मंडळ पांगारे, ता. महाबळेश्‍वर, आनंदा बाबुराव थोरात सदस्य नेहरु युवा मंडळ ओंड, ता. कराड, सिध्दनाथ शिंदे उत्कृष्ट मार्गदर्शक वेश्रशीलशपीं िीेक्षशलीं नेहरु युवा केंद्र सातारा, विशाल शिंदे सचिव नेहरु युवा मंडळ पिंपरे बु. ता. खंडाळा, रामदास धुरगुडे सचिव नेहरु युवा मंडळ भिरडाचीवाडी, ता. वाई, विक्रम बर्गे सदस्य नेहरु युवा मंडळ कोरेगाव, महेश सोनावणे (खपींशीपरींळेपरश्र ऋेश्रज्ञ ऊरपलश 2016-17 मध्ये सलग पहिला नंबर राष्ट्रीय शिक्षा अभियान स्टेट लेवल प्रथम क्रमांक दिग्दर्शन) यांना युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे मानखेडकर यांनी सांगितले.