Breaking News

शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा अर्थसंकल्प : शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे

मुंबई, दि. 19- महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा आणि शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत शेतकर्‍यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करणारा तसेच शेतकरी कर्जमुक्त व्हावा या दृष्टीने शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकर्‍यांना लाभ मिळवून देणारा हा अर्थसंकल्प आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यालाही अर्थसंकल्पामधून दिलासा मिळाला आहे. कृषी क्षेत्राचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांवर या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. उर्जा, उद्योग, पाणीपुरवठा या क्षेत्रासाठी योग्य तरतूद करतानाच राज्यातील शिक्षण आणि उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढीला महत्व देण्यात आले आहे. आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक समाजासाठी या अर्थसंकल्पात सकारात्मक तरतूद करण्यात आली आहे. केंद्राच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर मुंबईच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी मध्ये महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा सुरु करण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि मराठीच्या वैभवासाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. आपले सरकार गतिमान व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात ई-प्रशासनासाठी अधिक तरतूद करण्यात आली आहे.