योगी आदित्यनाथ आज उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
लखनौ, दि. 19 - उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी भाजपचे फायरब्रांड नेते आणि कट्टर हिंदुत्ववादी योगी आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपच्या आमदारांची लखनौमध्ये बैठक झाली. त्यामध्ये त्यांच्या नावावर एकमत झालं. दिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार आहे. लखनऊमध्ये आज दुपारी 2 वाजता योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
योगी आदित्यनाथ यांचा उत्तर प्रदेश राजकारणावर प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची धुरा देण्यात आली आहे. महंत योगी आदित्यनाथ यांचा जन्म 5 जून 1972 रोजी उत्तराखंडच्या गढवालमध्ये झाला. त्यांचं मुळ नाव अजय सिंह असं आहे. गढवाल विश्वविद्यालयातून त्यांनी बीएससीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं आहे. 1998 पासून ते गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. याशिवाय आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ ह्यांचे वारसदार मानले जातात.