Breaking News

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आता माझे मित्र नाहीत : विराट कोहली

शिमला, दि. 29 - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेदरम्यान अनेक कटू अनुभव समोर आले आहेत. पण मी आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मित्र मानत नाही, असं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला.
गावसकर-बॉर्डर मालिका भारताने 2-1 ने जिंकल्यानंतर कोहलीला विचारलं की, स्टीव्ह स्मिथ आणि ऑस्ट्रेलियन संघ अजूनही तुझे मित्र आहेत का? यावर भारतीय कर्णधाराने अतिशय स्पष्ट उत्तर दिलं. तो म्हणाला की, नाही, आता पहिल्यासारखं नाही. मी आधी असाच विचार करायचो, पण आता सगळं बदललं आहे. खेळाच्या वातावरणात तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून खेळायचं असतं, पण मी चुकीचा ठरलो. पहिल्या कसोटीनंतर मी जे म्हटलं होतं, त्याबाबत मी पूर्णत: चुकीचा सिद्ध झालो. त्यामुळेे मी त्याचा पुनरुच्चार करणार नाही.
विराट कोहली म्हणाला की, या संपूर्ण मालिकेत मी प्रतिस्पर्धी संघाचा सर्वात मोठा शत्रू होतो. त्यांनी माझ्यावर वेगळ्या पद्धतीने निशाणाही साधला. मालिकेत माझी कामगिरी फारशी चांगली नव्हती. आता टीकाकारांना माझ्याविरोधात बोलण्याची पूर्ण संधी मिळाली असेल. पण मला यामुळे काहीही फरक पडत नाही.