पुण्यात पोलिस भरतीसाठी प्रथमच बायोमेट्रिकचा वापर
पुणे, दि. 24 - पुणे शहर पोलिस दलातील 239 पोलिस शिपायांच्या जागांसाठी बुधवार पासून (दि. 22) शिवाजीनगर पोलिस मुख्यालय येथे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्यावेळी भरतीमध्ये डमी विद्यार्थ्यांचे रॅकेट आढळून आल्यानंतर पोलिस भरतीसाठी यंदा पहिल्यांदाच ‘बायोमेट्रिक’ पध्दतीचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक चाचणीच्या वेळी उमेदवाराचे ‘बायोमेट्रिक’ थंब घेतले जाईल. या भरतीसाठी साधारण 35 हजार अर्ज आले आहेत.
राज्यात सर्व पोलिस आस्थापनाच्या ठिकाणी आँनलाईन पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी 20 मार्चपर्यंत आनलाइन अर्ज करायचे होते. पुणे शहर पोलिस दलातील 239 जागांसाठी 35 हजार अर्ज आले आहेत. गेल्या वर्षी राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमध्ये चाळीस हजारापेक्षा जास्त अर्ज आले होते.
पुणे पोलिसांकडून राबविण्यात येणार्या भरती प्रक्रियेत डमी विद्यार्थ्यांचा प्रकार टाळण्यासाठी पहिल्यांदाच बायोमेट्रिक पध्दतीचा वापर केला जाणार आहे. भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची छाती व उंची मोजणीच्या वेळी उमेदवारांचे बायोमेट्रिक थंब घेतले जाईल. त्यानंतर इतर शारीरिक चाचणीच्या वेळी आणि बालेवाडी येथे होणार्या 1600 मीटर धावण्याच्या चाचणीच्या वेळी थंब घेण्यात येणार आहे.
तसेच लेखी परीक्षेच्या वेळी ही माहिती ठेवून त्या ठिकाणी बायोमेट्रिक थंब घेतले जाईल. त्यामुळे डमी विद्यार्थी परीक्षेला आला, तरी तात्काळ पकडला जाणार आहे. भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पोलिसांकडून बायोमेट्रिक पध्दत राबविण्यात येत असल्याचे सहायक पोलिस आयुक्त गणपत माडगुळकर यांनी सांगितले.