आमदारांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन
पुणे, दि. 24 - राज्याचा अर्थसंकल्प मांडत असताना विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 19 आमदारांचे निलंबन करण्यात आले. त्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गुरूवारी (दि. 24) आंदोलन करण्यात आले. परंतु, राष्ट्रवादीच्या 36 पैकी बहुतांश नगरसेवकांनी या आंदोलनाकडे पाठ फिरविली. त्यामुळे राष्ट्रवादी एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादीचे महापालिकेतील गटनेते योगेश बहल, प्रवक्ते फजल शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, विनोद कांबळे, आनंदा यादव हे सहभागी झाले होते.
महापालिकेत राष्ट्रवादीचे 36 नगरसेवक आहेत. त्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच नगरसेवक पक्षाच्या आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादीतील गटबाजी उघड झाली असून, सत्ता गेल्यामुळे नगरसेवक पक्षाला किंमत देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या आंदोलनात सत्ताधारी भाजपचा निषेध करण्यात आला. 19 आमदारांचे निलंबन करून सरकार मनमानी कारभार करत असल्याची टिका राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी केली.