पिंपरी-चिंचवड शहरात शिव जयंती उत्साहात साजरी
पुणे, दि. 17 - छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, अशा जयघोषात (बुधवारी) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संस्था, संघटना तसेच शाळा, महाविद्यालयांमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.
भगवे झेंडे हातात घेवून दिल्या जाणार्या घोषणांमुळे शहरातील संपूर्ण वातावरण शिवमय होऊन गेले होते. शिवजयंती साजरी करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी भगव्या पतका, भगवे झेंडे लावण्यात आले होते.
काही ठिकाणी मंडळांनी किल्ल्यांचे देखावे उभारले होते. त्यासमोर आकर्षक आणि भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तोफांच्या प्रतिकृतीही ठेवण्यात आल्या होत्या. मंडळाच्या मिरवणुकीमध्ये ढोल-ताशांचे पथक सहभागी झाले होते. चिंचवडगावातील मिरवणुकीमधील बाल शिवाजी सगळ्यांचे लध वेधून घेत होता.
पिंपरीगावीतील अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला शगून चौकातून सुरुवात झाली आहे. मिरवणुकीत शिवाजी महाराजांचा आकर्षक सेट, पालखी, हत्ती, घोडे, उंट आहेत. 400 मुला-मुलींचे लेझिमचे पथक, 150 मुला-मुलींचे मर्दानी खेळाचे सादरीकरण केले जात आहे. तसेच भगवे झेंडे घेऊन स्केटिंग वर मुलांचे थरारक प्रात्यक्षिक, मुला, मुलींचे मल्लखांबाचे, योगसानाचे प्रात्यक्षिक, मुलींचे जिमन्यास्टीकचे प्रात्यक्षिक पथक सहभागी झाले आहे.
त्याचबरोबर बँड पथक, वारकरी भजनी मंडळाचे पथक, ढोल ताशांची 4 वेगवेगळी पथके, बंगाली महिलांचे शंखनात वाद्यपथक, केरळी बांधवाचे वाद्यपथक, पंजाबी बांधवांचे भांगडा ढोलपथक, राजस्थानी, सिंधी बांधवांचे वाद्यपथक सहभागी झाले आहे.