व्हॉल दूरूस्तीसाठी भादोला वासीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
बुलडाणा, दि. 11 - वेळोवेळी निवेदने, तक्रारी देवूनही नगर परिषद बुलडाणा यांच्या ताब्यातील पाईल लाईनच्या व्हॉल दुरूस्तीचे काम न झाल्याने मौजे भादोला येथील ग्रा.प.सरपंच, सदस्य यांच्यासह नारीकांनी जिल्हाधिकार कार्यालयासमारे आमरण उपोषण सूरू केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, भादोला गावाकडे पाणी पुरवठा करणार्या पाईल लाईनचा नगर परिषद बुलडाणा यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जिजाऊ आईस्क्रिम चिखली रोड या ठिकाणचा मेन व्हॉल ना दुरूस्त झालेला आहे. तो दूरूस्त करण्यासाठी न.प.कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांना वारंवार सुचना, निवेदन देवूनही व्हॉल ची दूरूस्ती करण्यात आलेली नाही. सदर ठिकाणी आमचे मार्फत व्हॉल चे खोदकाम करण्यात आलेले असून मुख्याधिकारी न.प.बुलडाणा व कर्मचारी यांना कळवूनही सदर व्हॉलचे काम होत नाही. त्यामुळे गावाला भिषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. सुरूवातील भादोला ग्रामपंचायत कडे असलेली 2016-16 ची पाणीपट्टी पूर्ण भरल्याशिवाय व्हॉल दुरूस्त होणार नाही अशी भूमीका नगार परिषद प्रशासनाने घेतली होती. मात्र सदर थकबाकी भरणा त्वरीत केल्यानंतर देखील व्हॉल दूरूस्त करून देण्यात आला नाही. त्यानंतरही वारंवार सदर व्हॉल दूरूस्तीस न.प.प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. तरी या गंभीर बाबीकडे आपण लक्ष घालावे अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.
निवेदनावर गंगाराम मिसाळ, सौ.आशाबाई गवई, सौ.स्वाती गवई, नर्मदाबाई ठेंग, सौ.रेणूका गवई, सुभाष ठेंग, संजय गवई, भारत ठेंग, संजय बगळे, कमलकर गवई, रामेश्वर जाधव आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.