श्री. शांतानंद महाराज यांच्या दिंडीचे अकोळनेर येथे स्वागत
। शिस्तबध्द दिंडी म्हणून ही दिंडी समजली जाते - हभप काळे
अहमदनगर, दि. 16 - नाथषष्ठीनिमित्त सद्गुरु शांतानंद महाराज आनंद आश्रम श्रीक्षेत्र रायतळे ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्याचे अकोळनेर येथे श्री संत सावता महाराज मंदिरात स्व. रावसाहेब गारुडकर परिवाराच्यावतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सुनिल गारुडकर, सौ.संगीता गारुडकर, प्रा.अमोल अनारसे, अर्चना अनारसे, सौ.ज्योती गारुडकर, विकास गारुडकर, अशोक मेहेत्रे, एकनाथ गारुडकर, वैभव गारुडकर, हभप मिठ्ूमहाराज साबळे, हभप रोहिदास भांडवलकर आदि उपस्थित होते.पारनेर तालुक्यातील शिस्तबद्ध दिंडी म्हणून ही दिंडी समजली जाते. या दिंडीचे 8 वे वर्ष आहे. या दिंडीत 200 वारकर्यांचा सहभाग आहे. या दिंडीचे संयोजन हभप महादेव महाराज काळे यांनी केले. याप्रसंगी भाविकांना सरबतचे वाटप करण्यात आले.