मनोरुग्ण महिलांना वस्त्र, अन्न दान देणे
सेवा प्रीत फौंडेशनचे कर्तव्यच - जागृती ओबेराय
अहमदनगर, दि. 16 - माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यामातून डॉ.धामणे दाम्पत्यांनी सुरु केलेली सेवा अनमोल आहे. त्यांच्या या सेवेत खारीचा वाटा म्हणून येथील मनोरुग्ण महिलांना वस्त्र, अन्नदान करुन सेवा प्रीत फौंडेशनने कर्तव्यच पार पाडले आहे, असे प्रतिपादन अध्यक्षा जागृती ओबेराय यांनी केले.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सेवा प्रीत फौंडेशनने माऊली सेवा प्रतिष्ठानच्या 105 महिलांना नवीन गाऊन (वस्त्र) भेट दिले. मिष्ठान्न भोजनाबरोबरच काही भेट वस्तू दिल्या, त्यावेळी ओबेराय बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, समाजातील वंचीत घटकांना मदत देणे हे फौंडेशनचे काम अविरत सेवा म्हणून करण्याचा आमचा संकल्प आहे. ज्यांना कोणीच नाही अशा निराधारांना आधार देणे महत्वाचे आहे, याच अनुषंगाने आमचे काम सुरु आहे. डॉ. धामणे दांपत्यांची सेवा ही एक प्रकारे ईश्वरसेवाच आहे. या सेवेत आमचा थोडाफार हातभार लागावा, या उद्देशाने वस्त्रदान, अन्नदानाचा संकल्प पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले, असे जागृती ओबेराय यांनी सांगितले.
प्रास्तविकात डॉ.सुचिता धामणे यांनी माऊली सेवा प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. मानवता धर्म व मानवसेवा याच भावनेने येथे रुग्णांची सेवा केली जाते. या सेवेतच ईश्वरसेवा केल्याचा आनंद मिळतो, असे त्या म्हणाल्या. यावेळी सेवा प्रीत फौंडेशनच्या पूजा ओबेराय, अनुभा अॅबट, शिल्पा सबलोक, सीमा गुलाटी, कवल ओबेराय, इशा जग्गी, मीना चांदोरकर, वंदना थापर,सोनिया अॅबट, अनिता शर्मा, नेहा भागवानी, मीनी खत्री आदी सदस्या उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी सुमीत गुलाटी यांनी अत्यंत कमी दरात फौंडेशनला कपडे दिले.