Breaking News

जनतेचा विश्‍वास आणि आर्शीवादाशिवाय राजकारणात यश शक्य नाही

। पालकमंत्री प्रा.राम शिंदेंचे प्रतिपादन

अहमदनगर, दि. 17 - जनतेचा विश्‍वास आणि आर्शीवादाशिवाय राजकारणात  यश शक्य नाही. जामखेडसह कर्जत पंचायत समितीमध्ये मिळालेले यश त्याचेच धोतक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी  केल.

जामखेड  पंचायत समितीचे  नवनिर्वाचित  सभापती सुभाष आव्हाड , उपसभापती राजश्री मोरे , कर्जतच्या सभापती पुष्पाताई शेळके  यांचा सत्कार  पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते तालुक्यातील जवळा येथे कण्यात आला . यावेळी ते बोलत होते. माजी सभापती श्रींरंग कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालल्या कार्यक्रमास  जवळा गटाचे सदस्य सोमनाथ पाचारणे , कर्जतचे नगराध्यक्ष  नामदेव  राऊत  , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत मोरे  ,  तालुकाध्यक्ष   रवी सुरवसे ,  अल्पसंख्याकचे  जिल्हाध्यक्ष  सलीम बागवान, ज्योती क्रांती पतसंस्थेचे अध्यक्ष  आजीनाथ हजारे , नगरसेवक शामीर सय्यद ,महेश निमोणकर  डॉ दिपक वाळुंजकर , बाळासाहेब व्यवहारे ,प्रशांत  पाटील  ,डॉ महादेव पवार , सरपंच अनिल पवार , उपसरपंच  गौतम कोल्हे , शरद हजारे , प्रशांत शिंदे ,उमेश रोडे   ,शहाजी पाटील ,राजेंद्र राऊत , बाळासाहेब लेकुरवाळे, बाजीराव पठाडे ,पुरूषोत्तम वाळुंजकर ,अभय नाळे  याच्यासह  मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
ना  प्रा शिंदे म्हणाले, गेल्या दोन वर्षात  मंत्रीपदाच्या माध्यमातून  कर्जत जामखेडच्या विकासाचे प्रश्र मार्गी लावण्याचा प्रयत्न  केला आहे.
 ही कामे करत असताना जनतेचा विश्‍वास संपादन केल्यामुळेच आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अनेकांची भाषणे  झाली .कार्यक्रमाचे प्रास्तविक आजीनाथ हजारे यांनी केले . सुत्रसंचलन संतोष सरसमकर यांनी तर आभार डॉ दिपक वाळुंजकर यांनी मानले. दरम्यान पालकमंत्री शिंदे यांच्यासह नवनिर्वाचीत पदाधिकार्‍यांची  सजविलेल्या  जीप गाडीतुन  सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.