सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर स्मारकासाठी शासनाकडे पाठपुरावा करू : इदाते
सातारा, दि. 17 (प्रतिनिधी) : सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जन्म गावी मुरुम येथे त्यांच्या नावाला शोभेल असे भव्य, दिव्य स्मारक उभारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे अश्वासन राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अध्यक्ष भिकुजी इदाते यांनी दिले.
सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांची जयंती त्यांच्या जन्मगावी मुरुम, ता. फलटण येथे जिल्हा परिषद, सातारा, पंचायत समिती, फलटण, सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर जयंती महोत्सव समिती व ग्रामपंचायत मुरुम यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर होते. प्रांरभी सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, श्रीमंत अमरजितराजे बारगळ, तहसीलदार विजय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, फलटण पंचायत समितीच्या सभापती रेश्मा भोसले, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, सरपंच चंद्रकांत खोमणे, अंकुशराव भांड, शंकरराव माडकर, गोविंद देवकाते, महादेवराव संकपाळ, अॅङ जी. बी. गावडे, दिलीप शिंदे, डी. के. पवार यावेळी उपस्थित होते.
सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांचा इतिहास शासनाकडे मांडणार असल्याचे सांगून इदाते म्हणाले, त्यांचा इतिहास हा पाठ्य पुस्तकाच्या माध्यमातून आला पाहिजे. त्यांचा इतिहास हा जगाला कळला पाहिजे. या महापुरुषाने काय काम केले आहे त्याची माहिती युवा पिढीला झाली पाहिजे. यातून युवा पिढीला निश्चित ऊर्जा मिळेल. या स्मारकासाठी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करुन हे स्मारक कसे उभे राहिल यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
अध्यक्षीय भाषणात नाईक-निंबाळकर म्हणाले, सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे मुरुम हे जन्म गाव असून या जन्म गावी त्यांचे स्मारक व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे. युवा पिढीला सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांची माहिती व्हावी यामधून ऊर्जा निर्माण व्हावी, असे स्मारक उभारले जाईल. हे स्मारक उभारणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.
यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, पंचायत समितीच्या सभापती रेश्मा भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.