जिल्हा मजदूर सेनेच्यावतीने शिवजयंती साजरी
अहमदनगर, दि. 17 - मनुष्य किती वर्षे जगला यापेक्षा तो आपले आयुष्य कसा जगला, हे महत्त्वाचे असते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्य निर्मितीची शपथ घेवून काही वर्षातच हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. अन्यायी राजवटींविरोधात लढा उभारून जीवाला जीव देणारे मावळे तयार करण्याचे काम त्यांनी केले. एक राजा म्हणून आपले कर्तव्य बजावताना कोणत्याही परिस्थितीत प्रजेवर अन्याय होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली. त्यामुळेच 4 शतकानंतरही छत्रपती शिवरायांना सर्वसामान्यांच्या हृदयात अढळ स्थान आहे. आजच्या समाजाने छत्रपतींचे विचार अंगिकारून त्यानुसार आचरण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा मजदूर सेनेचे संस्थापक अध्यक्ष बाबुशेठ टायरवाले यांनी केले.
जिल्हा मजदूर सेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती एमआयडीसीतील इंडियन सिमलेस कंपनीच्या तीनही युनिटमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्य युनिटमधील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून टायरवाले बोलत होते. त्यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर पी.के.कपूर, कंपनीचे अधिकारी भाउसाहेब चेमटे, चैतन्य शिंदे, पी.एम.पाटील, विकास जोशी, अतुल भोसले, वसंत जोरवर, युनियनचे पदाधिकारी राजेंद्र वाकळे, कचरू ढगे, विनायक दाडेकर, अण्णा गिते, बाबा कोतकर, संजय शिरसाठ, विकास लकारे, मिलिंद शेटे, किरण धाडगे आदी उपस्थित होते.