Breaking News

दिन दुबळ्यांच्या जिवनात आनंद निर्माण करण्याचे काम करावे - राजेंद्र दराडे

अहमदनगर, दि. 17 - सर्वांनी समाजाचे आपण  काही देणे लागतो. या भावनेने समाजातील दिन दुबळयांच्या जिवनात आंनद निर्माण करण्याचे काम करावे. क्षेत्र कोणतेही असो आपल्या कामातून  समाजहित जोपासावे. मी ही सामान्य कुटुंबातून  आलो आहे. समाजप्रती समाजातील गरीब विदयार्थ्यांचे दु:ख काय असते मी अनुभवले आहे.  असे प्रतिपादन नंदुरबारचे तहसिलदार राजेंद्र दराडे यांनी जामखेड येथे आलोक मिठूलाल नवलाखा यांच्या वाढदिवसानिमित्त  मदीनतूल उल्लुम या मदरशातील मुलांना मिठाई वाटपाच्या  कार्यक्रम प्रसंगी केले .
नवकार फौडेंशन व पंचक्रांती सांस्कृतिक शैक्षणिक व क्रिडा मित्र मंडळ यांच्यावतीने चिरजीव आलोक मिठूलाल नवलाखा याचे वाढदिवसानिमित्त जामखेड येथील मदीनतूल उल्लूम या मदरशातील मुलांना मिठाईचे वाटप व मदतीचा धनादेश देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार राजेंद्र दराडे  प्रमुख उपस्थितीतामध्ये  ज्योती क्रांती मटिस्टेटचे  चेअरमण अजिनाथ हजारे, उपसंपादक अलताप  कडकाले,मौलाना मुफती अफजल  पठाण, मझहर काझी,  मेहबुब  सुभेदार, शेरखान पठाण,खिजरभाई शेख, ताहेर खान, नगरसेवक राजेंश वाव्हाळ, शाकीर खान, भाऊराव  राळेभात,  तुकाराम अंदुरे, संजय  वारभोग,  यासीन  शेख , प्रविण  बोलभट, विष्णू गंभीरे, राजेंद्र  गोरे, राजु भोगील, राजु शिरोळे, संदेश घायतडक, जुबेर काझी, मौनाला आकीब ,मौलाना जूबेर,  हाजी आय्युब खान,  मनिषा नवलाखा, सोनाली  बोराटे,  मदरशातील सर्व  विदयार्थी  उपस्थित होते.
यावेळी मौलाना खलील म्हणले की, समाजात काम करत असताना जाती धर्माच्या पलीकडे जावून माणूकीचा विचार केला पाहिजे. कोणत्याही धर्माचा माणूस असो दु:ख सर्वांचे  समान असते. माणूकीच हाच मोठा धर्म आहे. माणूकीच्या नात्यातूनच समाजातील वंचित आश्रू पुसण्याचे  व मदतीचे काम काही लोक करतात. म्हणूनच या देशात  अशा काही लोकांमुळेच सामाजिक सलोखा देशात कायम आहे. नवलाखा यांनी यांच भावनेतून  लोकांना प्रेरणा देईल असा उपक्रम केला. व आपला आंनद मदरशातील आनाथ निराधार गरीब कुटुबांतील मुलांबरोबर साजरा केला  यावेळी मिठुलाल नवलाखा यांनी मदरशाला मदत म्हणून  धनादेश दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिठूलाल नवलाखा यांनी केले सुत्रसंचलन  लियाकत शेख व आभार मौलाना मुफती अफजल पठाण यांनी केले.