लाकडाविना होळी करण्याचे पर्यावरणप्रेमींकडून आवाहन
सातारा, दि. 12 (प्रतिनिधी) : हिंदुस्थानी संस्कृतीत विशेष महत्त्व असणार्या सण-उत्सवांमधील होळी हा लोकप्रिय सण आहे. हा सण योग्य पध्दतीने आणि पर्यावरणपूरक होईल, याची काळजी आपण सर्वांनी घेण्याची गरज आहे. पर्यावरणाला बाधा पोचेल, असे कोणतेही कृत्य न करता उत्साहाला आवर घालून लाकडाविना होळी साजरी करावी, असे आवाहन विविध पर्यावरणवादी संघटना आणि संस्थांनी केले आहे.
शहरात ठिकठिकाणी होळी पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते. सार्वजनिक मंडळे, नागरिक एकत्र येऊन ठिकठिकाणी लाकडे जाळून होळी करतात. खरे तर पर्यावरणाची जपवणूक व्हावी, यासाठी गेल्या काही वर्षापासून ’लाकडाविना आणि पोळी विना होळी’ असा उपक्रम सामाजिक संस्था राबवत आहेत. त्यास नागरिकांकडून प्रतिसादही वाढता आहे. अशा उपक्रमांना अधिक बळ देण्याची आवश्यकता आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार्या हरित सेनेमार्फत पर्यावरणपूरक होळीसाठी प्रयत्न केले जातात. भावी पिढीवर पर्यावरणपूरक संस्कार घडण्याच्या दृष्टीने ही बाब अधिक महत्त्वपूर्ण व आशादायक आहे. अशा उपक्रमांना समाजातूनही पाठबळ मिळण्याची आवश्यकता पर्यावरणाविषयक संवेदनशील असलेल्या नारिकांना वाटते.
होळी पेटवताना लाकडे व गोवर्यांऐवजी पालापाचोळा आणि कचरा जाळावा. आरोग्याला हानिकारक असणार्या गोष्टीही या सणाच्या निमित्ताने जाळून टाकाव्यात, नवीन, चांगले संकल्प करावेत. या होळीत विघातक विचार, भ्रष्टाचारी आपापल्या परीने प्रत्येकाने नष्ट करावा.
त्याचप्रमाणे तंबाखू, सिगारेट, गुटखा, पानमसाला अशा पदार्थांची प्रतिकात्मक होळी करुन शरीरास जीवघेणे ठरणारे हे पदार्थ वैयक्तिक आयुष्यातून काढून टाकावेत. अशी आगळीवेगळी होळी सगळयांनीच साजरी करावी, असे मत सामाजिक क्षेत्रात काम करणार्या संस्था-संघटनांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि महाराष्ट्र विवेक वाहिनीने नागरिकांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी, असे आवाहन केले आहे. लाकडांऐवजी परिसरातील केरकचरा, जळाऊ पदार्थ यांची होळी करावी. होळीत पूरणपोळीचा नैवेद्य टाकण्याऐवजी परिसरातील गोरगरिबांना, अनाथ मुलांना, गरजूंना द्यावी, असे आहवान ’अनिस’चे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले आहे.