Breaking News

दुर्बल घटकातील रुग्णांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल आरोग्याची पंढरी ठरला - डॉ.अनिल बोरगे

अहमदनगर, दि. 22 - दुर्बल घटकातील रुग्णांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल आरोग्याची पंढरी ठरला आहे. येथे अत्यल्प दरात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळत असल्याने संपुर्ण राज्यात आनंदऋषीजी हॉस्पिटलने नांवलौकिक मिळवला. रुग्णांमध्येच ईश्‍वरीसेवा पाहून जैन सोशल फेडरेशनचे सामाजिक कार्य चालू आहे. अत्याधुनिक अद्यावत सेवा देण्याचा हॉस्पिटलचा मानस असून यासाठी मनपाच्या वतीने सहकार्य करण्याचे आश्‍वासन मनपा आरोग्याधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी दिले.  
राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या 25 व्या रजत पुण्यस्मृतीदिनानिमित्त श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये श्रीमती जयकुंवरबाई मोतीलालजी लोढा व लोढा परिवाराच्या वतीने आयोजित मेंदू, मणके व मज्जारज्जू संबंधीत मोफत आजार तपासणी शिबीराच्या उद्घाटना प्रसंगी डॉ.बोरगे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून, सामाजिक कार्यकर्ते वसंत लोढा, जयकुंवरबाई लोढा, ओरीयंटल इन्शुरन्सचे रिजनल मॅनेजर एस.पी. भारद्वाज, मनिषा लोढा, सुरेंद्र लोढा, राजेंद्र मुथा, जितेंद्र लोढा, परेश लोढा, बडीसाजन ओसवाल श्रीसंघचे अध्यक्ष विलास लोढा, उपाध्यक्ष रतीलाल कटारीया, अलका लोढा, न्युरो सर्जन डॉ.तनय सोलापुरकर, डॉ.प्रकाश कांकरीया, विशाल शेटीया, मिलिंद जांगडा, दिपक बोथरा, डॉ.आशिष भंडारी, सतीश लोढा, राजेंद्र बोथरा, सुंदरलाल भंडारी, अजीत कर्नावट, अनिल लुंकड, नरेंद्रकुमार चोरडिया आदि उपस्थित होते.