मातंग समाजाच्या वतीने नवनिर्वाचित जि.प. सदस्य व पंचायत समिती सदस्याचा सत्कार
अहमदनगर, दि. 22 - श्रीगोंदा तालुक्यात श्रीगोंदा पंचायत समिती अस्तित्वात आल्यापासून पंचायत सदस्य पदी प्रथमच मातंग समाजाचा प्रतिनिधी निवडून आला. त्यामुळे श्रीगोंदा तालुका मातंग समाजाच्या वतीने नवनिर्वाचित जि. प. सदस्य व पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम बालाजी मंगलकार्यालय येथे अण्णाभाऊ साठे पुरस्कार विजेते भगवानराव गोरखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पहिल्यांदा मातंग समाजाला उमेदवारी देऊन निवडून आणल्याबद्दल तालुक्यातील मातंग समाजाच्या वतीने बबनराव पाचपुते यांचे आभार मानून नूतन पंचायत समिती सदस्य नानासाहेब ससाणे यांचा सत्कार ठेवून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जि. प. सदस्या प्रतिभाताई पाचपुते, नूतन सभापती पुरुषोत्तम लगड, नूतन उपसभापती प्रतिभा झिटे, नानासाहेब ससाणे, अमोल पवार, सौ. मनीषा कोठारे, सौ. आशाबाई गोरे, शहाजी हिरवे या सर्व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किरण ससाणे यांनी केले. या कार्यक्रमामध्ये बहुजन रयत परिषदेचे तालुकाध्यक्ष अशोक शिंदे, डॉ. बाळासाहेब पवार, मातंग युवक संघटनेचे नंदकुमार ससाणे, खादी ग्रामोद्योगचे संचालक मनोज घाडगे, बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष वसंत सकट, जगदंबा सोसायटी, वांगदरीचे संचालक बापूराव गायकवाड, दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव बुलाखे यांची भाषणे झाली. या प्रसंगी गुलाबराव तोरडमल, भागचंद शिरवाळे, मा. ग्रामपंचायत सदस्य सत्यवान शिंदे, फकिरा ससाणे, राजू ससाणे, आबा तोरडमल, रघुनाथ शिंदे, छगन सुलाखे, सामाजिक कार्यकर्ते बापू कसबे, नीलकंठ जंगले, पत्रकार अंकुश तुपे, संदीप जगधने, संतोष शेलार आदि समाजबांधव बहुसंखेने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक शिंदे, नंदकुमार ससाणे, सत्यवान शिंदे, मनोज घाडगे, प्रा. किरण ससाणे यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी उपस्थितांचे आभार संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.
क्लबच्या अध्यक्षा पल्लवी शिंगी म्हणाल्या की, क्लबच्या माध्यमातून या शाळेतील खोल्यांना रंग देण्यात आला, वॉश बेसिन बसविले गेले, खेळाचे साहित्य, ग्रंथालयासाठी कपाट, वॉटर प्युरिफायर, दिवाळीचा पराळ, शूज, स्वेटर्स आदी साहित्य दिले. त्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी गणपती बनवा कार्यशाळा, महिला पालकांसाठी फनी गेम्स, तज्ज्ञांची व्याख्याने, शोभेच्या वस्तु बनविणे कार्यशाळा, शैक्षणिक साहित्य वाटप आदी एक ना अनेक उपक्रम राबविले. यापुढील काळात इतर शाळांची निवड करून तेथेही हॅप्पी स्कूल प्रोजेक्ट राबविण्याचा मानस असल्याचे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वाडगे यांनी केले, तर आभार आरती फिरोदिया यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचे पालक, तसेच क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.