Breaking News

राष्ट्रवादीकडुन सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

। आमदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घ्या - मागणी 

अहमदनगर, दि. 23 - शेतकरी कर्जमाफीसाठी विधानमंडळात आवाज उठविणार्‍या 19 आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भाजप सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन, आमदारांवरील निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. 

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगरसेवक विजय गव्हाळे, संपत बारस्कर, विपुल शेटीया, अविनाश घुले, अजय चितळे, साधना बोरुडे, अ‍ॅड. शारदा  लगड, निखील वारे, रेश्मा आठरे आदिसह  कार्यकर्ते उपस्थित होते.
अहमदनगर  शहराचे आमदार संग्राम जगताप, श्रीगोंद्याचे राहुल जगताप व वैभव पिचड यांच्या सह 19 आमदारांवर 9 महिन्यासाठी निलंबन करण्यात आले आहे. अर्थसंकल्पा दरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात गदारोळ घालणार्‍या विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचे 9 महिन्यासाठी निलंबन करण्यात आले असुन या आमदारांवरील निलंबन त्वरीत मागे घ्यासाठी बुधवारी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे.
सर्वसामान्यांसह विधानपरिषदेत परिचारक यांच्या दुष्कृत्याचा सर्वच पक्षाच्या सदस्यांनी निषेध करत त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी लावून धरली. जवानांच्या कुटुंबियांवर शिंतोडे उडवणार्‍या परिचारक यांचा गुन्हा क्षम्य नव्हता तरीही आमदार आणि सत्ताधारी पक्षाचे ते असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यास महिना लागता मात्र शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर आवाज उठवणार्‍या आमदारांवर तातडीने कारवाई करण्यात आली असल्याने अजब तुझे सरकार म्हणण्याची वेळ आली आहे असे अविनाश घुले म्हणाले.