Breaking News

डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार खरोळा प्राथमिक आरोग्य केंद्राला

जिल्ह्यातील 75 आशा कार्यकर्ती,प्रवर्तक यांना आशा अवार्ड

लातूर, दि. 23 - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी पुरस्कार, आशा अवार्ड, कायाकल्प पुरस्कार व उत्कृष्ट आरोग्य कर्मचारी पुरस्कारांचे वितरण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. मिलींद लातुरे यांच्या हस्ते दगडोजीराव देशमुख सभागृहात करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख्य उपस्थित होते.
जिल्ह्यातील डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी पुरस्कार योजनेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र खरोळा (प्रथम), प्राथमिक आरोग्य केंद्र वांजरवाडा (द्वितीय), प्राथमिक आरोग्य केंद्र हलगरा (तृतीय) या आरोग्य संस्थांना तसेच आरोग्य उपकेंद्र मोघा ता. उदगीर (प्रथम), आरोग्य उपकेंद्र तुंगी ता. औसा (द्वितीय), आरोग्य उपकेंद्र काजळहिप्परगा ता. अहमदपूर (तृतीय) यांना तसेच ग्रामीण रुग्णालय चाकुर (प्रथम), यांना पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आले.
आशा आवार्ड पुरस्कार योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 75 आशा कार्यकर्ती/ गट प्रवर्तक यांना आशा अवार्ड मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. कायाकल्प पुरस्कार योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वांजरवाडा, नळेगाव, हेर, खरोळा, हलगरा या आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. सदर  पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्ह्यातील 1,000 आशा / गट प्रवर्तक, सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी, कर्मचारी व आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
संबंधित पुरस्कार प्राप्त आशा / गट प्रवर्तक / वैद्यकीय अधिकारी यांच्या कामाबद्दल कौतूक करून नुतन जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे यांनी जिल्हा हगणदारी मुक्त करण्यासाठी मान्यवर पदाधिकारी / अधिकारी व सर्वांनी मिळून काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.  तर उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनीही सर्व आशांचे ग्रामीण  भागामध्ये उत्कृष्ट काम करत असल्याबद्यल अभिनंदन करून त्यांच्या काही अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत असे आश्‍वासन दिले. तसेच  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेनुसार संपूर्ण जिल्हा सन 2018 पर्यंत हगणदारीमुक्त करण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सुधीर बनशेळकीकर / डॉ. शेख / डॉ. चंद्रज्योती धनगे यांनी केले असून कार्यक्रमाचे  आभार प्ररदर्शन डॉ. कलमे आनंद यांनी केले.