विश्वनाथ महाडेश्वर महापौर, हेमांगी वरळीकर उपमहापौर
मुंबई, दि. 08 - मुंबई महापालिकेच्या महापौरपदी शिवसेना नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर, तर उपमहापौरपदी शिवसेनेच्याच हेमांगी वरळीकर विराजमान झाले आहे. महापौर- उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आवाजी मतदानात महाडेश्वर यांना शिवसेना-भाजपची मिळून एकूण 171 मतं मिळाली, तर हेमांगी वरळीकर यांनाही 171 मतं मिळाली. या निवडणुकीत भाजप नगरसेवकांनीही शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याने, महापौर-उपमहापौरपदाच्या उमेदवारांना बक्कळ मतं मिळाली.
महापौरपदासाठी काँग्रेसकडून विठ्ठल लोकरे यांनी अर्ज भरला होता. त्यांना काँग्रेसच्या संख्येएवढीच म्हणजे अवघी 31 मतं मिळाली. तर उपमहापौरपदासाठी विन्नी डिसुझा यांनी अर्ज भरला होता. त्यांनाही 31 मतंच मिळाली. मुंबई महापालिकेत 84 जागा मिळालेल्या शिवसेनेला चार अपक्षांची साथ मिळाल्याने त्यांचं संख्याबळ 88 वर पोहोचलं होतं. महत्त्वाचं म्हणजे महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या 83 नगरसेवकांनी विश्वनाथ महाडेश्वर यांना पाठिंबा दिला. त्यामुळे महाडेश्वर यांना एकूण 171 मतं मिळाली. समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. परंतु त्यांनी तटस्थ राहून कोणालाही मतदान केलं नाही. तर पक्षाकडून निरोप न आल्याने मनसेचे सात नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेला जाणं टाळलं.