गंजपेठेत हप्ता देण्यास नकार देणार्या जोडप्यास मारहाण; तिघांना अटक
पुणे, दि. 23 - उसाचे गुर्हाळ चालविण्यासाठी हप्त्याची मागणी केल्यानंतर हफ्ता देण्यास नकार देणार्या जोडप्यास तिघांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली.
बबलू भंडारी, गोविंद अजिले आणि मयुर कोमपल्ली (सर्व राहणार, मासेआळी, गंजपेठ, पुणे) असे आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका रसवंती मालकाने तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचे कानिफनाथ रसवंती नावाने उसाचा रस विक्रीचा व्यवसाय आहे. जानेवारी ते 2016 पासून ते गंज पेठेतील मासेआळी, पाराची तालीम ट्रस्टच्या जागेत हा व्यवसाय करतात. वर नमुद केलेल्या आरोपींनी फिर्यादींना या ठिकाणी व्यवसाय करायचा असेल तर महिन्याला दोन हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगत त्यांच्याकडून वेळोवेळी 8 हजार रुपये घेतले.
नेहमीप्रमाणे आरोपींनी कालही (20 मार्च) फिर्यादीकडे पैशाची मागणी केली. परंतु पैसे नसल्यामुळे त्यांनी देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी फिर्यादींना लाकडी पट्टीने मारहाण केली. फिर्यादींची पत्नी बचावासाठी आली असताना आरोपींनी त्यांनादेखील मारहाण केली.
याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक जी.डी.नाईक अधिक तपास करीत आहेत.