मुरली विजयबद्दल चुकीने अपशब्द निघाला, स्मिथचा माफीनामा
धर्मशाला, दि. 29 - टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयला शिवी दिल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने माफी मागितली आहे. भावनांवर आवर घालता न आल्याने अपशब्द निघाला, त्याबद्दल माफी मागतो, असं स्मिथने म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुसर्या डावात जोश हेझलवूडचा झेल मुरली विजयने घेतला. त्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू सेलिब्रेशन करत पॅव्हेलियनकडे निघाले. मात्र पंचांनी हेझलवूडला बाद देण्यास नकार दिला.
पंचांच्या निर्णयानंतर भारतीय खेळाडूंना परत बोलावण्यात आलं तेव्हा मुरली विजय मैदानाकडे धावत येत असताना ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या स्टीव्ह स्मिथने मुरली विजयला शिवी दिली. हा सर्व प्रकार कॅमेर्यात कैद झाला होता. ऑस्ट्रेलिया आणि भारताचे चारही कसोटी सामने खेळाडूंच्या वादामुळे चांगलेच चर्चेत राहिले. धर्मशाला कसोटीतच ग्लेन मॅक्सवेलच्या विकेटनंतर जाडेजा आणि मॅथ्यू वेड यांच्यातील तणाव वाढला होता.
सामन्यात तुमचा पराभव झाल्यानंतर निवांतपणे सोबत डीनर करु, असं आपण मॅथ्यू वेडला म्हणाल्याचं जाडेजाने सांगितलं. जाडेजाने ऑस्ट्रेलियाच्या दुसर्या डावातही महत्वाच्या तीन विकेट्स घेतल्या.