माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने होळी मिलन उत्साहात
बुलडाणा, दि. 23 - बुलडाणा येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने होळी मिलन महोत्सव सोहळा शनिवार 18 मार्च रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्थानिक बुलडाणा अर्बन छात्रनिकेतनच्या सभागृहात होळी मिलन महोत्सवानिमित्त शनिवारी दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बुलडाणा माहेश्वरी मंडळाच्या महिलांनी विविध कार्यक्रम सादर केले.
होळी मिलन महोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून यावर्षी माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने 6 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींसाठी होळीवर आधारीत हिंदी चित्रपटातील गीते, 20 ते 45 वर्ष वयोगटातील स्पर्धकांसाठी राजस्थानी गिते व 45 वर्षा वरील स्त्री-पुरूष गटासाठी भजन गायन स्पर्धा आणि माती व लाकडा पासून तयार केलेल्या वस्तुंवर आधारित गणगौर सजावट स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धकांनी होळीवर आधारित हिंदी चित्रपटातील व राजस्थानी गिते सादर करुन महिला रसिकांचे मनोरंजन केले तर होळीवर आधारित भजन स्पर्धेला देखील उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी स्पर्धांचे निकाल घोषित करण्यात आले. यावेळी गणगौर सजावट स्पर्धेत ज्योती टावरी यांना प्रथम तर संतोष राठी यांना द्वितीय बक्षिस देवून गौरविण्यात आले. राजस्थानी होळी गित स्पर्धेत ममता लाहोटी व वैष्णवी राठी यांना प्रथम बक्षिस देण्यात आले तर मध्यम गटातील प्रिती सोनी, मिरा चांडक, प्रणिता लाहोटी व साधना वर्मा यांना प्रोत्साहनपर बक्षिस देवून गौरविण्यात आले.
गित स्पर्धेसाठी अनंता देशपांडे व सुमन बाहेती तर गणगौर सजावट स्पर्धेसाठी निर्मला लाहोटी, दुर्गा बजाज यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.कोमलताई झंवर यांचे मार्गदर्शनाखाली माहेश्वरी महिला मंडळाच्या डॉ.सौ.स्वाती लढ्ढा, सौ.विजया राठी, सौ.त्रिवेणी बजाज, सौ.मीनल मुंधडा, कार्यकारिणी सदस्या सौ.रमा लढ्ढा, सौ.दिपाली चांडक, सौ.मनिषा जावंदीया, सौ.प्रणिता लाहोटी, सौ.मिरा चांडक व सौ.ज्योती टावरी आदिंनी परिश्रम घेतले.