वनांच्या समृध्दीसह संवर्धनासाठी वन विभागाने जनशक्तीचा वापर करावा : मुद्गल
सातारा, दि. 23 (प्रतिनिधी) : वनांची टक्केवारी घसरत चालली आहे. पर्यावरणातील बदलाचे मोठे संकट आपल्या समोर उभे आहे. वनांच्या समृध्दी व संवर्धनासाठी वन विभागाने जनशक्तीचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आज केले. वन दिनानिमित्त सातारा येथील वनभवनमध्ये आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, सहाय्यक वनसंरक्षक संजीवन चव्हाण, अनंत जोशी यावेळी उपस्थित होते.
शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये नागरिकांचा सहभाग मिळत नाही तोपर्यंत कोणतीही योजना यशस्वी होत नाही, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, भोगौलिक क्षेत्राच्या 33 टक्के वनक्षेत्र पाहिजे. वनांची टक्केवारी घटत आहे. याचे दुष्परिणाम आज दिसत असून ॠतुचक्रात त्याचा बदल दिसत आहे. कधीही पाऊस पडणे, गारपीट होणे यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शाश्वत विकास केला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने वनांबाबत अनेक योजना तयार केल्या आहेत. येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात 50 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. हरित सेनेमध्ये 10 हजार 500 लोकांनी नोंदणी केली आहे. हरित सेनेच्या माध्यमातून पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने वनांच्या समृध्दीसाठी व संवर्धनासाठी चळवळ उभी केली पाहिजे, असे आवाहन मुद्गल यांनी शेवटी केले.
21 मार्च हा आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. मागील वर्षी 2 कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत 127 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. येत्या जुलै महिन्यामध्ये वन विभागामार्फत 7 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वनापासून मिळणार्या प्रत्येक गोष्टींवर माणूस अवलंबून आहे. पाण्याचे स्त्रोत जास्त करुन हे वनांमधून आहेत. अशा या वनांच्या अस्तित्वाला मोठा धोका निर्माण झाला आहे. वनांचे संरक्षण व विकास करण्यासाठी प्रत्येकाने सक्रीय सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन अंजनकर यांनी केले.
या कार्यक्रमात संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत जांभळी, ता. वाई, तांदल, ता. फलटण स्वरुपखानवाडी, ता. माण उत्कृष्ट काम करणार्या संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांचा जिल्हाधिकारी मुद्गल यांच्या हस्ते धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच वन विभागातील उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचाही जिल्हाधिकारी यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक वनसंरक्षक संजीवन चव्हाण यांनी केले तर आभार अनंत जोशी यांनी मानले. या कार्यक्रमास वनविभागातील अधिकरी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.