Breaking News

कृषी विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 18 - राज्याचा अर्थसंकल्प हा प्रगतीशील असून कृषी विकासाला चालना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि.18) अर्थसंकल्प मांडल्यावर दिली.
सरकारने कृषी क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीमुळे त्याचा विकास दर वाढतो आहे. त्या माध्यमातून कृषी शाश्‍वतीकडे नेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची भूमिका आणि सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे. घरे बांधणी, शौचालय निर्मिती, कृषी विकास, ग्रामविकास आणि अन्य भागांमध्ये राज्य सरकार पुढे जात आहे, असेही फडणवीस म्हणाले.