नाफेडची तुर खरेदी त्वरीत सूरू करण्याची मेहकर तालूका शिवसेनेचे मागणी
बुलडाणा, दि. 18 - मागील काही दिवसांपासून मेहकर मधील नाफेड तुर खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध नसल्या कारणामुळे शेतकर्यांचे हाल होत आहे. याबाबत शेतकर्यांनी अधिकार्यांना विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देवून टाळाटाळ करीत आहे. तरी शासनाने याकडे त्वरीत लक्ष घालून नाफेड तूर खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध करुन द्यावा तसेच तुरीला हमी भाव देवून कृषी उत्पन्न खुल्या बाजारामध्ये तुर खरेदी करण्यात यावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मेहकर तालूका शिवसेनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी मेहकर यांना देण्यात आला आहे.
निवेदनावर माधवराव जाधव कृउबास सभापती, राजु गाडेकर उपजिल्हा प्रमुख शिवसेना, सुरेश वाळूकर ता.प्रमुख, समाधान साबळे, दत्ता शेळके, केशवराव खुरद, सुदर्शन मगर, सुभाष राठोड, संतोष चनखोरे, शालीकराम वाघ, राजुभाऊ पाचकर, उत्तमराव परमळे यांच्यासह इतरांच्या स्वाक्षर्या आहेत.