अरुंधती भट्टाचार्य यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुलडाणा राष्ट्रवादीची निदर्शने
बुलडाणा, दि. 18 - भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी केलेल्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा निषेध म्हणून आज दि.17 मार्च रोजी शहर राष्ट्रवादीच्या वतीने स्टेट बँकेसमोर निदर्शने देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी व एसबीआय शाखा व्यवस्थापक यांना निवेदनही सादर करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी वित्तीय शिसत पाळण्यासंदर्भात आपले मत मांडले. त्यात त्या म्हणाल्या की शेतकर्यांना कर्जमाफी दिल्याने बँकांना तर त्यांची रक्कम परत मिळेल परंतू असे केल्याने शेतकर्यांची पतशिस्त बिघडेल. शेतकरी आर्थीक अडचणीत असतांना अरुंधती भट्टाचार्य यांनी केलेले वक्तव्य म्हणजे शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करुन हवालदिल शेतकर्यांची थट्टा केली आहे. या वक्तव्याचा निषेध म्हणून बुलडाणा तालूका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दुपारी 2 ते 4 या वेळेत भारतीय स्टेट बँक शाखा बुलडाणा समोर निदर्शने करण्यात आले असून शेतकर्यांना त्वरीत कर्जमाफी करावी याकरीता आपणाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येवून शेतकर्यांना दिलासा देण्यात यावा. असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर दत्तात्रय लहाने, अतुल लोखंडे, सुनिल सोनुने यांच्यासह इतरांच्या स्वाक्षर्या आहेत.