Breaking News

जिल्हयात 11 तर चिखली मतदार संघात 7 नविन विद्युत उपकेंद्राना मंजुरात

बुलडाणा, दि. 18 - चिखली मतदार संघातील मौजे आमखेड व अमडापूर उपकेद्रा अंतर्गत होणारा विद्युत पुरवठा पुरेशा दाबाने न होणे परीणामी रोहित्र जळणे यामुळे गावकुसातील नागरीकांबरोबरच शेतकर्‍यांची होणारी प्रचंड कुचंबना व शेती पिकाचे नुकसान पाहता संपुर्ण जिल्हयात विविध ठिकाणी मोर्चे, आंदोलने करून नागरीकांनी नविन रोहित्र बसवुन पुरेशा दाबाने विद्युत पुरवठा होण्याची मागणी केली होती. चिखली मतदार संघाचे आमदार राहूल बोंदे्र यांनी या आधिवेशनात या संदर्भात तारांकीत प्रश्‍न उपस्थित करून उर्जा विभागासमोर या मागण्या रेटल्या. यावर उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवनात सादर केलेल्या लेखी उत्तरात ही समस्या मान्य करून यावर केलेल्या उपाय योजनेची माहिती सादर करतांना तातडीने कार्यवाही करण्यात येईल असे आश्‍वासन दिले. 
चिखली तालुक्यातील मौजे आमखेड या गावातील पुर्व भागात होणारा विद्युत पुरवठा पुरेशा दाबाने होत नसल्याची मागील अनेक वर्षापासून ग्रामस्थांची तक्रार होती. त्यासाठी नविन रोहित्र बसवून मिळावे व पुर्ण दाबाने विद्युत पुरवठा व्हावा याचा गावकर्‍यांकडून आग्रह होता. त्याचबरोबर मतदार संघातील उंद्री  (तोरणवाडा) पेठ (धोत्रा भनगोजी) नायगांव बु, मेरा बु., कोलारा, जामठी (सोयगांव) व म्हसला बु. या भागातील शेतकर्‍यांची व गावकर्‍यांची विद्युत उपकेंद्राची मागणी होती. या भागातील नागरीकांचा व शेतकर्‍यांना होणारा त्रास लक्षात घेता पुरेशा दाबाने विद्युत पुरवठा केल्या जावा, जेणेकरून शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या योजनांची समस्या दुर व्हावी अशी नागरीकांची मागणी होती. चिखली मतदार संघा बरोबरच जिल्हयातही अनेक ठिकाणी हा प्रश्‍न असल्याने या संदर्भात चिखली मतदार संघाचे आमदार राहुल बोंद्रे यांनी तारांकीत प्रश्‍नाचे माध्यामतून शासनाचे लक्ष वेधून या संदर्भात शेतकर्‍यांनी केलेल्या वेगवेगळया आंदोलनाची माहिती सभागृहाला देत कार्यवाहीची मागणी केली होती. त्यावर उत्तर देतांना उर्जा मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्राहकाची मागणी व प्रत्यक्ष विद्युत भार लक्षात घेवून बुलडाणा जिल्हयामध्ये सन 2014-15 मधील 171 रोहित्र, सन 2015-16 मध्ये 559 रोहित्र व सन 2016-17 मध्ये 248 रोहित्र असे एकुण 978 नविन वितरण रोहित्र बसविण्यात आल्याची माहिती देतांनाच दिनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत 33/11 केव्हीएची आठ नविन उपकेेंद्र, 170 नविन रोहित्र व एकात्मीक उर्जा विकास योजने अंतर्गत 33/11 केव्हीएची तिन नविन उपकेंद्र, 47 नविन रोहित्र असे एकुण 217 रोहित्र मंजुर केल्याची माहिती दिली असून सदर रोहित्र बसविण्यासाठी निविदा प्रक्रीया सुरू केल्याचे स्पष्ट केेले. यात चिखली मतदार संघातील उंद्री  (तोरणवाडा) पेठ (धोत्रा भनगोजी) नायगांव बु, मेरा बु., कोलारा, जामठी (सोयगांव) व म्हसला बु. या 11 केव्ही विद्युत उपकेंद्राचा समावेश आहे. यामुळे चिखली मतदार संघा बरोबरच बुलडाणा जिल्हयातील विजेची व नविन वितरण रोहित्राची समस्या मार्गी लागण्याचा मार्ग सुखर झाला आहे.
आमदार राहुल बोंद्रे यांनी उपस्थितीत केलेल्या विद्युत प्रश्‍नामुळे चिखली मतदार संघा बरोबरच बुलडाणा जिल्हयातील शेतकरी व ग्रामस्थांची अडचण दुर होण्यास मदत होणार आहे.