जैववैद्यकीय कचर्यासाठी जिल्हा रुग्णालयास प्रदूषण मंडळाची नोटीस
सातारा, दि. 20 (प्रतिनिधी) : जैववैद्यकीय कचर्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याने क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने इशारा नोटीस बजावली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली आहे. जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन कायदा 2016 अंतर्गत का कारवाई करण्यात येऊ नये, असेही प्रदूषण मंडळाने नोटिसीमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट दिली. प्रदुषण नियंत्रण मंडळाने जैव वैद्यकीय कचर्याचे वर्गीकरण करण्यासाठी नियमावली आखून दिली आहे. मात्र, मंडळाच्या निकषानुसार जैववैद्यकीय कचर्याची विविध रंगाच्या पिशव्यामध्ये योग्य प्रकारे वर्गीकरण केल्याचे दिसून आले नाही. तसेच जैववैद्यकीय कचरा कचरा कुंड्यावर अस्ताव्यस्त टाकला होता त्यामध्ये, इंजेक्शनच्या सुया, सलाईन, बॅन्डेज, कापूस यांचा समावेश होता. तसेच जैव वैद्यकीय कचर्याबाबत परिचारिका व कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले गेले नसल्याने ते कसेही हाताळताना दिसून येत आहे. जैववैद्यकीय कचरा नगरपालिकेच्या सांडपाण्यामध्ये जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच जिल्हा रूग्णालयातून बाहेर पडणार्या सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नसल्याने हे दुषित पाणी नाल्यामध्ये मिसळत आहे. या बाबी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांच्या निदर्शनास आल्याने रूग्णालयाला इशारा नोटीस बजावली आहे. जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन कायदा 2016 अतंर्गत का कारवाई करण्यात येवू नये, असेही प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी बी. एम. कुकडे यांनी दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे.