Breaking News

टेक्निकल स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासास पूरक : काटेकर


सातारा, दि. 20 (प्रतिनिधी) : टेक्निकल स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला पूरक ठरतात असे मत गौरीशंकर संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले. ते सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, लिंब येथे आयोजित केलेल्या टेक्निकल स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी बोलत होते. काटेकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी बनवलेली उपकरणे व त्यासाठी घेतलेले परिश्रम पाहता त्यांच्यामधील असलेले कौशल्य गुण दिसून येत आहेत.
प्राचार्या डॉ. विद्युलता मोहिते, उपप्राचार्य प्रा. संतोष इतराज, समन्वयक प्रा. अनुप माळी, प्रा. रंजना ढमाळ, प्रा. सायली जाधव, प्रा. वर्षा भोसले, प्रा. सरीता बलशेटवार यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेमध्ये सातारा, कराड, सांगलीच्या तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पेपर प्रेझेटेशन, रोबो रेस, रोबोवार, टेक्निकल क्युज, मॉडल मार्केटींग, कोडीग, प्रोग्रामिन वार, रोबोटेक्नोच्या स्पर्धेमध्ये मॅकेनिकल विभागात आनंदवेध पाठक, सिध्दात पवार, अन्सारी मुक्तार, इरफान शेख, मयुर नुराळे ई अ‍ॅण्ड टी. सी विभागात मृणाली वाळगडे, प्राची जाधव, ॠतुजा सावंत, चैतन्य टकसाळे, राहुल लोटे सव्हिल विभागात अभिषेक निकम, शरद दडस, प्रविण माने, धनजय यवले, कॉम्प्युटर विभागात अभिजीत जाधव, अफया सय्यद, पृथ्वीराज पाटील यानी व त्यांच्या ग्रुपने विजेत्ये पद प्राप्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. विद्युलता मोहिते यानी व आभार उपप्राचार्य प्रा. संतोष इतराज यानी मानले.