Breaking News

विद्यापीठातील अनियमित कारभारांवर चौकशी समितीची नेमणूक

पुणे, दि. 18 - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनियमित कारभारांसंदर्भात, तसेच गैरव्यवहारांबाबत आमदार मेधा कुलकर्णी यांनी राज्यपाल व कुलपती सी. विद्यासागर राव यांना भेटून तक्रार केली. राज्यपालांनी निवेदनातील प्रत्येक मुद्यांवर चौकशी समिती नेमून कारवाई करण्याचे करण्याचे निर्देश दिले आहेत.
यावेळी त्यांच्याबरोबर प्रामुख्याने विद्यमान कुलगुरू प्रा. वासुदेव गाडे यांच्या बायोडेटाचा मुद्दा, संतोष कांबळे यांच्याशी संबंधित कार्यालयातील लैंगिक अत्याचाराचा मुद्दा, 2014 मधील निलंबित सेवकास 2017 पर्यंत भाडेपोटी 8 लाख असूनही विद्यापीठात दिलेला आश्रय, विद्यापीठातील बेसुमार झाडे तोडण्याचा मुद्दा, विद्यापीठातील विविध अनधिकृत बांधकामांचा मुद्दा, कुलगुरू व इतर अधिकारी यांनी वेळोवेळी मोठ्या प्रमाणात घेतलेल्या आर्थिक रकमांचा मुद्दा, तसेच एआयसीटीईची मंजुरीशिवाय विद्यापीठाशी संलग्न काही कॉलेजमध्ये चालवले जाणारे कोर्सेस व इतर अनेक विषयांबाबत सखोल चर्चा झाली. राज्यपालांना दिलेल्या निवेदनातील प्रत्येक मुद्यांवर चौकशी समिती नेमून कारवाई करण्याचे करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कुलगुरूंच्या नेमणुकीपूर्वीच सर्व चौकशी करून मगच नियुक्ती करण्याचे निर्देश डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीस देणार असल्याचे सांगितले.