Breaking News

उपहारापूर्वी भारताला दुसरा धक्का, विजय माघारी

रांची, दि. 18 - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसार्‍या कसोटीत भाराताला दुसरा धक्का बसला. उपहारापूर्वी सलामीवीर मुरली विजय 82 धावा करुन माघारी परतला. उपहाराला केवळ एक ओव्हर शिल्लक असताना, ओकिफने त्याला मॅथ्यू वेडकरवी स्टम्पिंग करुन तंबूत धाडलं. विजय बाद झाला तेव्हा भारताच्या 2 बाद 193 धावा झाल्या होत्या. भारत अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा 258 धावांनी पिछाडीवर आहे. मात्र त्यापूर्वी विजयने चेतेश्‍वर पुजारासोबत 102 धावांची भागीदारी रचली.
भारताने आज एक बाद 120 धावांवरुन तिसर्‍या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मुरली विजय शतकाचे दिशेने कूच करत होता, त्याची आश्‍वासक फलंदाजी पाहता, तो शतक ठोकेल असं वाटत होतं. मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या नादात तो चकला आणि बाद झाला.
भारतासाठी आज  एक दिलासादायक बाब म्हणजे, क्षेत्ररक्षणादरम्यान जखमी झालेला कर्णधार विराट कोहली, मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. कोहलीची दुखापत बरी झाली असून, तो फलंदाजीसाठी सज्ज आहे.