Breaking News

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन

अहमदनगर, दि. 20 - अहमदनगर जिल्हयातील अंगणवाडी कर्मचार्‍यांचा अक्षदा गार्डन मंगल कार्यालय येथे जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या माण्याा आणि आंदोलन यावर चर्चा करण्यात आली. राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांना दरमहा मानधन मिळावे. शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा देण्यात यावा., समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, यासह इतर मागण्या शासनाने मंजूर केल्या नाहीत तर अंगणवाउी कर्मचारी तीव्र आंदोलन करतील. वेळ पडल्यास बेमुदत संपही करतील असा ठराव मेळाव्यात करण्यात आला आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या अध्यक्षा माया परमेशवर होत्या. धुळे, जळगाव, ठाणे, सातारा येथील महिलांनी मार्गदर्शन केले. प्रस्ताविक प्रभावती सत्रे यांनी केले तर सूत्रसंचालन नम्रता राऊत - हजारे यांनी केले.