Breaking News

ज्येष्ठ नागरिक महासंघाचे पुण्यात विभागीय अधिवेशन

सातारा, दि. 18 (प्रतिनिधी) : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) च्या पुणे प्रादेशिक विभागाचे चौथे विभागीय अधिवेशन रविवार दि. 19 मार्च रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत पंकज मल्टीपर्पज हॉल कराड येथे होणार असल्याची माहिती फेस्कॉम प्रदेश उपाध्यक्ष प्रा. विठ्ठलराव जाधव यांनी दिली. 
अधिवेशनास पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघ, राज्याच्या 11 विभागाचे अध्यक्ष तसेच फेस्कॉमचे राज्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी महासंघाचे भारताचे अध्यक्ष डी. एन. चापके, डॉ. शं. वा. किंजवडेकर, राज्यअध्यक्ष, द. लु. चौधरी (जळगाव), नानासो इंगळे (अकोला), अण्णासाहेब टेकाळे (मुंबई), अरुण रोडे, अशोक तेरकर, श्रीराम बेडकीहाळ, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व कराड अर्बन को. ऑप बॅकेेने स्वीकारले असून मुख्य अतिथी म्हणून वा. ना. उत्पात, डॉ. धनंजय गुंडे आणि अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात ज्येष्ठांच्या सर्व प्रश्‍नांवर चर्चा होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघांच्या सदस्यांनी अधिवेशनास जास्तीत-जास्त संख्येेने उपस्थित रहावे, असे आवाहन फेस्कॉम प्रदेश उपाध्यक्ष प्रा. विठ्ठलराव जाधव व शहर अध्यक्ष डॉ. नंदलाल कुलकर्णी यांनी केले आहे.