विद्यार्थ्यांची फसवणूक; क्लासचालकाचा पोबारा
वाई, दि. 18 (प्रतिनिधी) : वाई येथे ऑस्कर क्लासेसच्या नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्याकडून 10 हजारांची फी वसूल करून रात्रीत पोबारा करून फसवणूक केल्याप्रकरणी क्लास चालकावर वाई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित क्लासचालकाने वाई, खंडाळा, महाबळेश्वरच्या विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.
वाई पोलीस व विद्यार्थ्यांकडून मिळालेली माहिती अशी, वाई एसटी आगाराजवळ ऑस्कर क्लासेस हा खासगी क्लास संदीप पोतदार काही दिवसांपासून 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेत होता. यासाठी संदीप पोतदार याने प्रत्येक विद्यार्थ्याकडून 10 हजार प्रवेश फी वसूल केली. क्लासमध्ये वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत. सोमवार, दि. 6 मार्चपासून क्लासला टाळे असून, सर्व विद्यार्थी क्लासकडे फेर्या मारत आहेत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितल्यानंतर खळबळ उडाली. पालकांनी विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन ऑस्कर क्लास चालवणार्या संदीप पोतदार याच्याविरोधात वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि शिरीष शिंदे तपास करत आहेत.