Breaking News

जिल्ह्यात तूर खरेदी केंद्र वाढ करावी- माजी आ. कव्हेकर

लातूर, दि. 23 - खरीप हंगामात विक्रमी उत्पादन झालेल्या सोयाबीन, तूर व रब्बी हंगामात झालेल्या हरभरा  या धान्याची खरेदी शासनाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेड या शासनाच्या विभागामार्फत हमी भावाने खरेदी चालु असून सदरील केंद्रावर बारदाना नाही.  सुंपुर्ण जिल्ह्यात फक्त 9 खरेदी केंद्र चालु आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात किमान 3 खरेदी केंद्र सुरूवात करावे. अशी मागणी जिल्हाधिकारी व नाफेडच्या सौ. मिराकुमार मिना कार्यकारी संचालक मुंबई यांच्याकडे माजी आ. कव्हेकर यांनी केली आहे.  त्यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन गुळमार्केट लातूर येथे चालु असलेल्या खरेदी केंद्रास भेट देवून त्या केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली.
याबरोबरच खरेदी केलेल्या मालाचे पेमेंट वेळेत द्यावे.  शेतकर्याचा  माल आठ दिवस लाईनला थांबून त्यांना मानसीक, आर्थीक व शारिरीक त्रास सहन करावा लागत असल्याच्या अनेक शेतकर्यांच्या तक्रारी त्यांच्याकडे आल्याने यासंदर्भात वास्तवीक परिस्थिती व अडचणी  खरेदी बाबतच्या गैरसोयी कर्मचार्यांची उदासिनता पाहण्यासाठी माजी आ. कव्हेकर यांनी भेट दिली.
यावेळी या केंद्राचे अधिकारी, जननायक संघटनेचे सुर्यकांतराव शेळके, कार्याध्यक्ष निळकंठराव पवार, तालुकाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, तालुका कार्याध्यक्ष माधवराव गायकवाड, पिंपरी अंब्याचे पोपटराव भिसे, सरपंच नानासाहेब भिसे, चेअरमन तात्यासाहेब पालकर, खुंटेफळचे सरपंच यशवंत शिंदे, चेअरमन हरिभाऊ शितोळे, पोलिस पाटील वसंतराव शिंदे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यादरम्यान माजी. आ कव्हेकर यांनी या केद्रावरील चालु असलेली परिस्थिती व उपलब्ध सुविधा शेतकर्यांना होत असलेल्या अडचणी तसेच दोन दिवसापासून रस्त्यालगट थांबलेल्या धान्याची वाहने यामुळे शेतकरी व वाहनधारकाला आर्थिक मानसिक संकटाचा सामाना करावा लागतो यांची माहिती देवून या सर्वांचा त्रास कमी करण्यासाठी सदर खरेदी केंद्रात ज्यादा स्वरूपात वजन काटे व कामगाराची व्यवस्था करून तात्काळ उपाययोजना शासनाने करावी अशी मागणी आपण जिल्हाकार्याकडे नुकतेच केलेली असून याची तात्काळ अमलबजावनी करण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे. त्यानुसार येथील कारभार करण्यात यावा अशी सुचना येथे उपस्थित असलेल्या खरेदी केंद्राच्या अधिकारी व कर्मचार्यांना बोलताना त्यांनी केले.