शिवसंग्राम च्या ‘रास्ता रोको’ मुळे नाफेड चे गोडाऊन सिल
बुलडाणा, दि. 30 - देऊळगांव राजा तालुक्यातील तुर खरेदी नाफेड मार्फ़त सुरु असून त्या मध्ये शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणुक नाफेड व खरेदी-विक्री संघ तसेच बाजार समिती यांच्या कडून होत आहे.शेतकरी 29 ते 25दिवसा पासून आपले तुरीने भरलेले वाहने घेऊन वखार महामंडळाचे गोडाऊन येथे थांबले आहे.या उलट बाजार समिति चे संचालक,खरेदी-विक्री संघाचे संचालक व व्यापारी यांचे तुरीचे वाहने तात्काळ मोजमाप करुन लवकर खाली करुन घेतले जातात.अशी तक्रार शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे केली होती परंतु या शेतकर्यांच्या गंभीर प्रश्नावर खरेदी विक्री संघ व बाजार समिति लक्ष्य देत नसल्याने 25 मार्च रोजी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने शेतकर्यांना सोबत घेऊन वखार महामंडल सिंनगाव जहाँगीर फाटयावर तब्बल अर्धा तास ’रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले होते.
शिवसंग्राम च्या ’रास्ता रोको’ आंदोलनाची दखल आमदार.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी घेतली.27 मार्च रोजी झालेल्या आमसभेत तुर उत्पातक शेतकर्यांच्या प्रश्न घेतला.नाफेड व बाजार समिती तसेच खरेदी-विक्री संघ यांच्या कडून तुर उत्पादक शेतकर्यांची पिळवणुक सुरूच आहे.संचालक मंडळ व व्यापारी यांची तुर विलंब न करता तात्काळ खरेदी करणे सुरूच आहे.असा आरोप शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी आम सभेत केला. तसेच वखार महामंडळाच्या गोडाऊन क्रमांक 3 मध्ये व्यापारी व संचालक मंडळ यांचा तुरीचा मोठ्या प्रमाणात कूपन नसलेला साठा असून तो तात्काळ पंचनामा करुण सिल करण्याची मागणी आमसभेचे अध्यक्ष आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या कडे शिवसंग्रामने केले.त्या अनुषंगाने आमसभेचे अध्यक्ष यांनी तात्काळ वखार मधील गोडाऊन तपासणीचे निर्देश तहसीलदार यांना दिले.त्यावर सभा संपल्यावर प्रभारी तहसीलदार मदन जाधव आणि नायब तहसीलदार प्रशांत जाधव हे चिखली रोड वरील वखार महामंडळाच्या गोडाउन क्रमांक तीन ची तपासणी करण्याकरिता गेले असता गोडाउन वॉचमन प्रभाकर म्हस्के यांच्या कडून गोडाउन च्या चाब्या नसल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे सदर गोडाउनचा बाहेरून सिल लावून पंचनामा करण्यात आला.यावेळी पंच म्हणून शिवसंग्राम तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,बाजार समिती सचिव प्रशांत शिंगणे,संचालक बबन डोके,शेतकरी गजानन घुगे यांच्या सह्या घेण्यात आल्या.तर एसडीओ यांच्या मार्फत सदर गोडाउन मधील तुरीचा पंचनामा केल्या जाईल असे प्रभारी तहसीलदार मदन जाधव यांनी सांगितले.