Breaking News

जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा ही यशाची गुरूकिल्ली: भाऊसाहेब ढोले


अहमदनगर, दि. 30 - जीवनामध्ये उच्च दर्जाचे यश मिळवायचे असेल तर जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा याचा अंगिकार केला तर यश निश्‍चित मिळते, असे  प्रतिपादन पोलीस उपअधीक्षकपदी निवड झालेले भाऊसाहेब ढोले यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव या त्यांच्या गावी ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ढोले यांचे गावात आगमन  होताच ग्रामस्थांनी फटाके वाजवून स्वागत केले. यावेळी अनेक महिलांनी त्यांचे औक्षण केले. भाऊसाहेब ढोले हे ज्येष्ठ पत्रकार कैलास ढोले यांचे सुपूत्र आहेत.  कार्यक्रमास सरपंच सुनंदा पोंधेे, विनर्स अ‍ॅकॅडमीचे संचालक बाळासाहेब शिंदे, सपोनि नारायण एकशिंगे, उपसरपंच पांडुरंग गोसावी, सेवा सोसायटीचे अध्यक्ष  काकासाहेब मरकड, दिलीप पोंधे, माजी मुख्याध्यापक कारभारी वाघ, प्रा. बाबुराव चन्ने, मदन चन्ने, शिवाजी ढोले आदी मान्यवर उपस्थित होते.