Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालयात शहीदांना अभिवादन

सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : शहीद दिनानिमत्त शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास तहसीलदार विवेक जाधव, नेताजी कुंभारे, नगरपरिषद प्रशासन अधिकारी किरणराज यादव, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.