Breaking News

वीवर्स ट्रेंड व फॅशन मंत्राच्या वतीने कर्तुत्वान महिलांचा सन्मान

अहमदनगर, दि. 24 - वीवर्स ट्रेंड व फॅशन मंत्रा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्या सुवर्णा जगताप तर प्रमुख पाहुण्या म्हणून शितल जगताप उपस्थित होत्या. 
माऊली संकुल सभागृहात झालेल्या महिलांच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. डॉ.हेमांगी पोतनीस यांनी महिलांच्या शाररीक, मानसिक व आरोग्य संतुलित राखण्यासाठी मार्गदर्शन केले. यासाठी आवश्यक असणार्या उर्जेच्या स्त्रोतचा उलगडा केला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते नगरसेविका सुवर्णा जाधव, वीणा बोज्जा, मेधाताई काळे, सरोज गांधी, अलका मुंदडा, मिनाताई मुनोत, पूजा गुंदेचा, हेमा सेलोत, विद्या बडवे, मनिषा व्ही. सर्जे, श्‍वेता पारेख, सुरेखा भोसले, अ‍ॅड.अनुराधा येवले, कल्पना शिरदावडे, अनिता काळे, रेखा जरे, अंजली देवकर, वैशाली ससे, सुनिता जगताप, श्‍वेता पारेख या विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांचा गौरव करण्यात आला.
अनिता काळे यांनी सादर केलेल्या जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रुबीना शेख यांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी शिका व कमवा हा स्वयंरोजगाराचा कानमंत्र दिला. स्त्री चे असतित्व या विषयावर प्रॉमिनंटच्या व्यवस्थापिका श्‍वेता पारेख यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिता काळे यांनी केले. उपस्थितांचे आभार रुबीना शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर व्हीनसच्या अध्यक्षा पल्लवी शिंगी, भाविका चंदे, सोमा गंगवाल यांचे सहकार्य लाभले.